Posts

Showing posts from October, 2021
Image
  आनंद पाळंदे सत्तर वर्षीय श्री. आनंद पाळंदे यांनी गेली ५० वर्षे   गिरिभ्रमणाचा आनंद लुटला आहे. महाराष्ट्रातील सह्य पर्वतामधील एकही डोंगरदरी , एकही दुर्गकपार किंवा एकही पठारप्रदेश नसेल जेथे पाळंदे यांनी भ्रमण केलेले नाही. १९६४ मध्ये साहित्यिक गो नी दाण्डेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढलेल्या ‘ दहा दिवस दहा दुर्ग ’ या यात्रेच्या पुण्यातील कार्यक्रमातून व शाखेच्या किल्ल्यांच्या सहलीतून त्यांना गडदुर्गांची ओळख झाली. व पुढे त्यांचे बंधू इतिहासाचे अभ्यासक श्री. रमाकांत पाळंदे यांच्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी दुर्ग पर्यटनाला आणि   गिरिभ्रमणाला   सुरुवात केली.   भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सानिध्यामुळे पाळंदे यांचे सह्याद्री गिरिभ्रमण हे अधिकाधिक डोळस होत गेले. श्री. चंद्रकांत वाकणकरमुळे   , मुंबईतील गिरिविहार संस्थेचे ते सभासद झाले. त्यांच्या हाईकमधून डोंगरातील आनंद अधिक समजून घेता आला. बैंक आफ बरोडातील नोकरीत आर्थिक स्थैर्य लाभल्यामुळे आवड जोपासत अभ्यास करणे सुलभ झाले. पुढे त्यांनी भारत आऊटवर्ड बाउंड पायोनियर्स या संस्थेचा रॉक क्लाइंबिंग...